AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस रोपवाटिका अनुदान
किसान कृषि योजनाअॅग्रोवन
ऊस रोपवाटिका अनुदान
राज्य सरकारने कृषी विद्यापीठाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे रोपवाटीकेमधून एक डोळ्याचे बेने वापरून पिशवीमध्ये ऊसाची रोपे तयार केल्यास दीड ते दोन महिन्याकरिता ते क्षेत्र इतर पिकांसाठी उपलब्ध होते तसेच रोपवाटिकेत तयार होणारे बेणे निरोगी व जोमदार वाढीचे असल्याने उत्पादनात निश्चितवाढ होती हा विचार करून राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हि योजना राबवण्याचा निर्णय घेतला बियाने कोठून मिळणार – शेतकऱ्यांना कृषिविद्यापीठे ,ऊस संशोधन केंद्र पाडेगाव किंवा वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट या ठिकाणाहून सुधारित जातीचे बेणे घेऊन बेणे मला तयार करायचा आहे.
लाभार्थी पात्रता – या योजनेचा लाभ घेऊ इच्छाणारा शेतकरी हा कृषी पदवीधारक असावा किंवा उस शेती करणारा अनुभवी शेतकरी असावा अनुदान – या योजनेंतर्गत आवश्यक अवजारे व मशिनरीकरिता अपेक्षित येणारा खर्च २ लाख ५० हजार गृहीत धरला आहे. याअंतर्गत लाभार्थींना ५० टक्के अनुदान दिले जाते. आवश्यक कागदपत्रे – सात बारा शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक. आधार कार्ड चे झेरॉक्स अधिक माहितीसाठी संपर्क –तालुका कृषी अधिकारी ,जिल्हा कृषी अधिकारी यांचे कार्यालय
40
0