AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस बेणे प्रक्रिया व लागवड नियोजन
गुरु ज्ञानAgroStar
ऊस बेणे प्रक्रिया व लागवड नियोजन
👉जर तुम्ही नवीन ऊस लागवडीचे नियोजन करत असाल, तर लागवडीसाठी योग्य जमीन आणि बेणे निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीसाठी आदर्श असते. तसेच, लागवडीसाठी कीड-रोगमुक्त 9 ते 11 महिन्यांचे बेणे वापरणे फायदेशीर ठरते. 👉ऊस लागवडीनंतर चांगली उगवण होण्यासाठी आणि सुरुवातीच्या अवस्थेत पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. बुरशीजन्य रोग आणि किडींच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळवण्यासाठी, मॅंकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्लूपी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @500 ग्रॅम आणि क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% इसी घटक असणारे अरेक्स कीटकनाशक @1 लिटर प्रति 200 लिटर पाण्यात मिसळावे. याशिवाय, 13:00:45 खत @2 किलोसुद्धा या द्रावणात मिसळून बेणे 15 मिनिटांसाठी बुडवावे आणि नंतर लागवड करावी. 👉लागवडीसाठी दोन डोळ्यांमधील अंतर 1.5 फूट आणि दोन सरींमधील अंतर 5 फूट ठेवावे, यामुळे पिकाची योग्य वाढ होते आणि उत्पादन क्षमता सुधारते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख