AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस बेणे प्रक्रिया व लागवड नियोजन
गुरु ज्ञानAgrostar
ऊस बेणे प्रक्रिया व लागवड नियोजन
🌱नवीन ऊस लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. कीड-रोगमुक्त 9 ते 11 महिने वयाचे बेणे लागवडीसाठी निवडावे. 🌱लागवड केल्यानंतर चांगली उगवण होण्यासाठी तसेच सुरुवातीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्बेन्डाझिम 50 % डब्लूपी घटक असणारे धानुस्टीन बुरशीनाशक @ 200 ग्रॅम,क्लोरोपायरीफॉस 20 % इसी घटक असणारे ऍग्लोरो कीटकनाशक @ 250 मिली ,13:00:45 - 2 किलो प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून 15 मिनिटांसाठी बेणे द्रावणात बुडून काढावे व नंतर लागवड करावी. लागवड करताना दोन डोळ्यातील अंतर 1.5 फूट आणि दोन सरीतील अंतर 5 फूट ठेवावे. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
2
इतर लेख