क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकासाठी फवारणीद्वारे अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
• माती परीक्षणानुसार कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते शेणखतामध्ये चांगली मिसळून मुरवावीत. त्यानंतर त्याचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. • आवश्‍यकता नसताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जमिनीतून वापर करणे टाळावे. • सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर फवारणी केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येतात. • फवारणीद्वारे या खतांचा वापर केल्यामुळे जमिनीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. • उसाच्या पानांवर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यामुळे खताची पिकाला उपयुक्तता वाढते. पानातील आवश्‍यक अन्नद्रव्‍यांचे प्रमाण योग्य राखून कमतरता असल्यास भरून निघते. • सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. हरितद्रव्याच्या निर्मितीत वाढ होते. परिणामी मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे शोषण सुद्धा वाढते. ऊस उत्पादनावर चांगला परिणाम होतो.यासाठी मल्टिमायक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानावर २ फवारण्या कराव्यात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमधे झालेल्या संशोधनानुसार मुख्य आणि सूक्ष्मअन्नद्रव्येयुक्त द्रवरूप खताच्या २ फवारण्या केल्यास ऊस उत्पादनात हेक्टरी ८ ते १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. • लागणीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ६० दिवसांनी द्रवरूप खतांची फवारणी करावी. मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची प्रति २०० लिटर पाण्यात प्रत्येकी २ लिटर मात्रा मिसळून पहिली फवारणी करावी. • दुसरी फवारणी लागणीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ९० दिवसांनी, मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खते प्रत्येकी ३ लिटर मात्रा प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • फवारणी करताना उसाची पाने दोन्ही बाजूंनी चांगली भिजतील याची काळजी घ्यावी. • फवारणी शक्यतो वारा कमी असताना संध्याकाळच्या वेळी करावी. • द्रवरूप खतामध्ये कोणतीही इतर रसायने मिसळू नयेत. • विशेषतः क्षारयुक्त किंवा चोपण जमिनीत आणि चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शोषण कमी होते. अशा वेळी मल्टिन्युट्रियंट द्रवरूप खताची फवारणी अधिक फायदेशीर ठरते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
10
संबंधित लेख