AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकावरील पायरीला किडीवर नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकावरील पायरीला किडीवर नियंत्रण !
🌱सध्या तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे ऊस पिकावर पायरीला किडीचा पादुर्भाव दिसून येत आहे, या किडीमुळे उत्पादनात साधारण २८ टक्के पर्यंत घट झालेली दिसून येते. 🌱किडीची ओळख: मादी हि पानाच्या खालच्या बाजूस पिवळसर रंगाची अंडी घालते.अंड्यातून पांढरट रंगाची पिल्ले बाहेर पडतात, तसेच या किडीच्या पाठीवर पंखासारखे अवयव असतात. 🌱किडीचा प्रादुर्भाव: पायरीला किडीला पाठीमागे चिमट्यासारख्या दोन शेपट्या असणारी पिल्ले तसेच तपकिरी रंगाच्या प्रौढावस्था पानावर दिसतात. हि किड रस शोषून घेते. या किडीच्या प्रादूर्भावामुळे पाने पिवळी पडतात. अधिक प्रादुर्भाव झाल्यास पानावर काळी बुरशी वाढते. प्रकाश संश्‍लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.उसाच्या वजनात व साखर उताऱ्यात घट येते. 🌱नियंत्रण : १. ऑगस्ट महिन्यानंतर उसाची खालची पाने काढावीत २. इपिरीनिया मेल्यॅनोल्युका या मित्र किटकाचे एकरी २,००० कोष अथवा २ लाख अंडी सोडावीत. ३. पाकोळीची अंडी गोळा करून म्हणजेच सुरुवातीला प्रादुर्भाव ग्रस्त पाने काढून त्यांचा नाश करावा. ४. तीन ते पाच पिल्ले किंवा प्रौढ अथवा एक अंडीपुंज प्रति पान दिसून आल्यास, क्लोरपायरीफॉस (२० ईसी) 3 मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1
इतर लेख