AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील हुमणी अळी नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
ऊस पिकातील हुमणी अळी नियंत्रण!
🎋हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पिकांची मुळे खातात. मुळे खाल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी शोषण बंद होऊन प्रादुर्भावग्रस्त पीक निस्तेज दिसते, पाने हळूहळू पिवळी पडण्यास सुरूवात होते व वीस दिवसात पूर्णपणे वाळलेली दिसतात. 🎋पिकाची मुळे कुरतडल्यामुळे संपूर्ण पीक वाळते. जमिनी खालील ऊसाच्या कांड्यानाही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त ऊसाला हलकासा झटका दिल्यास ऊस सहजासहजी उपटून येतो. हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सहजासहजी नियंत्रण करणे शक्य नाही त्यासाठी प्रतिबंधात्मक नियोजन आवश्यक आहे. 🎋नियंत्रणासाठी लागवडीवेळी कार्बोफ्युरॉन 3% घटक असणारे फ्युराडान 8 ते 10 किलो प्रति एकर जमिनीत मिसळावे आणि लागवड झाल्यानंतर पिकाच्या अवस्थेनुसार फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्लूजी घटक असणारे कॉन्स्टा 150 ग्रॅम आणि डेल्टामेथ्रीन 100 इसी 11% घटक असणारे डेसिस-100 एकरी 250 मिली यांची एकत्रीत आळवणी अथवा ड्रीप च्या माध्यमातून सोडावे. 🎋संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
9
इतर लेख