AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील लोकरी मावा कीड नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
ऊस पिकातील लोकरी मावा कीड नियंत्रण
👉🏻ऊस पानांच्या खालच्या बाजूस लोकरी मावा दिसतो. पंखी माव्याची मादी काळसर असून, बिनपंखी माव्याची मादी पांढऱ्या रंगाची असल्याने तिला पांढरा लोकरी मावा म्हणतात. या किडीचा प्रसार वारा, मुंग्या, तसेच किडग्रस्त पाने किंवा बेण्यांद्वारे होतो. पिल्ले व प्रौढ माद्या पानांचा रस शोषून पिकाला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे पानांच्या कडा सुकतात, काळी बुरशी वाढते, आणि ऊस कमकुवत होतो. याचा परिणाम उत्पादनात व साखर उताऱ्यावर होतो. 👉🏻ढगाळ हवामान व 70-95% आर्द्रता ही परिस्थिती या किडीच्या वाढीस पोषक असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, किडग्रस्त ऊस बियाणे नवीन लागवडीसाठी वापरू नये. ऊस लागवड पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी. सुरुवातीस मावा आढळल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने काढून जाळून टाकावीत व पाण्याचा अतिरेक टाळावा. 👉🏻प्रादुर्भाव जास्त असल्यास, क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% ईसी घटक असलेले अरेक्स @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात फवारावे. ठिबक प्रणालीत थायोमेथॉक्झाम घटक असलेले शटर @ 100 ग्रॅम प्रति एकर वापरावे. संतुलित खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे फायदेशीर ठरते. यामुळे ऊस पिकाचे आरोग्य सुधारेल आणि उत्पादन टिकवता येईल. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख