AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील पोंगा मर समस्येवर उपाययोजना!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
ऊस पिकातील पोंगा मर समस्येवर उपाययोजना!
नुकसानीचा प्रकार - अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत उसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशीवर उपजीविका करते. नंतर ती अळी खोडाच्या आत शिरुन उगवणाऱ्या कोंबाला ७-८ दिवसांत खाऊन टाकते. त्यामुळे १२-१८ दिवसांत आपणास पोंगा मर दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर व लागवडीपेक्षा खोडवा पिकात अधिक प्रमाणात दिसून येतो. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो. खोड किडीचे नियंत्रण - 👉 हलक्‍या जमिनीत उसाची लागवड टाळावी. 👉 बेणे मळ्यातील निरोगी व किडीविरहीत बेण्याची निवड करावी. 👉 फार प्रादुर्भाव झाल्यास शेत विरळ दिसते. अशा वेळेस एकरी रोपांची योग्य प्रमाण 👉 राखण्यासाठी लागवडीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये पुरेसे रोपे तयार करून ठेवावीत. योग्य वेळी विरळ जागी ही रोपे लावावीत. 👉 पाण्याच्या पाळ्या जर वेळेवर देता येत नसतील, तर पाचटाचे मल्चिंग अवश्‍य करावे. त्यामुळेदेखील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. 👉 उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल. पतंग बाहेर पडणार नाहीत. 👉 उसामध्ये मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत. 👉 वाढ जोमदार व फुटवे जास्त प्रमाणात येणाऱ्या वाणांवर या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो. 👉 ऊस लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ३ ते ४ ट्रायकोकार्ड प्रति हेक्‍टर लावावीत. 👉 खोडकीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा. 👉 हेक्‍टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावे. 👉 पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. 👉 अधिक प्रादुर्भाव असल्यास क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @१५० मिली प्रति एकर याप्रमाणात आळवणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
9
इतर लेख