अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
ऊस पिकातील तण व्यवस्थापन!
➡️ आडसाली तसेच पूर्वहंगामी लागवड केलेल्या उसातील तण नियंत्रणासाठी सुरुवातीला बाळबांधणी सारखी आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे.
➡️ तसेच ऊस पिकातील लांब आणि रुंद पानांच्या तणांसाठी तण 2 ते 4 पाने अवस्थेत असताना मेट्रीबुझिन ७०% WP घटक असलेले वारिस तणनाशक 300 ग्राम प्रति १५० लिटर पाण्यासोबतच 2,4-डी घटक असलेले विडमार सुपर @ 1 लिटर प्रति 150 पाणी याप्रमाणे घेऊन एकरी फवारणी करावी.
➡️ तणनाशकाची फवारणी करताना फ्लॅट पॅन अथवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा आणि तणनाशकांचे द्रावण तयार करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा.कधीही तणनाशकांची फवारणी करतांना जमिनीत वापसा असणे आवश्यक आहे.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.