AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील तणांचे नियंत्रण!
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकातील तणांचे नियंत्रण!
उसामधील तणांच्या नियंत्रणासाठी, ऊस लागण केल्यापासून साधरणतः ३० दिवसानंतर मेट्रीब्यूझीन घटक असणारे टाटा मेट्री ३०० - ४०० ग्रॅम सोबत २-४,D घटक असणारे विडमार सुपर १ लिटर दोन्ही एकत्र करून प्रति एकरी फवारणी करावी. तणनाशक फवारणी करताना महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीत चांगला वाफसा असावा तसेच एकरी १५० ते २०० लिटर पाण्यात औषधाचे द्रावण तयार करून फवारल्यास प्रभावी नियंत्रण होऊ शकेल. २-४,D वापरत असताना आपल्या प्लॉट शेजारी भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, पपई, कापूस यांसारखी पिके असल्यास त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यासाठी काळजी घ्यावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
115
9
इतर लेख