AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील चाबूक काणी रोगाची लक्षणे आणि उपाय!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकातील चाबूक काणी रोगाची लक्षणे आणि उपाय!
➡️ लागवडीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उसाच्या शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो कालांतराने पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटून आतील बुरशीचे काळे बीजाणू बाहेर पडतात. हे बीजाणू हवेद्वारे निरोगी उसाच्या डोळ्यावर पडतात आणि त्या ठिकाणी रोगाची लागण होते. काणी रोगामुळे उसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो आणि पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते. यावर उपाय म्हणून लागवडीपूर्वी निरोगी आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे. यासाठी उसाचे बेणे कार्बेन्डॅझिम @100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या द्रावणात 10 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. लागवडीच्या उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव 5 टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा उसाचा खोडवा घेऊ नये. 3 ते 4 वर्षानंतर उसाचे बेणे बदलावे. शेतात कणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा, संपूर्ण बेट मुळासकट उपटून काढावे व जाळून नष्ट करावे. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-152,AGS-CP-702&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3
इतर लेख