अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
उसाची चांगली वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. ऊस लागवडीपासून साधारणतः ४५ ते ६० दिवसांनी बाळ बांधणी करून घ्यावी. यामुळे फुटवे चांगले फुटून हवा खेळती राहते.
सोबतच जमिनीतून युरिया ५० किलो, २४:२४:०० - ५० किलो एकत्रित मिसळून प्रति एकर फोकून द्यावे. यामध्ये १९:१९:१९ @ २ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तसेच खतांचा अपटेक चांगला होण्यासाठी व पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी युरियाला शुगरकेन स्पेशल ५०० ग्रॅम प्रति एकर चोळून द्यावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.