AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊसावरील पांढरा लोकरी मावा किड!
गुरु ज्ञानAgrostar
ऊसावरील पांढरा लोकरी मावा किड!
🌱ढगाळ हवामान, 70 ते 95% सापेक्ष आर्द्रता असे हवामान लोकरी माव्याच्या वाढीस अनुकूल असते. प्रादुर्भाव जूनपासून वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये सर्वात जास्त असतो. ऊस पिकामध्ये लोकरी मावा पानांच्या खालील बाजूस आढळतो. पंखी माव्याची मादी काळसर, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट दिसते, म्हणून त्यास पांढरा लोकरी मावा म्हणतात. या किडीचा प्रसार किडग्रस्त बेणे तसेच वारा, मुंग्या याद्वारे होतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर पिल्ले आणि प्रौढ माद्या ऊसाच्या पानाखाली राहून पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पीक निस्तेज होते व पानांच्या कडा सुकतात. लोकरी माव्याच्या शरीरातून बाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट द्रवामुळे पानावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होऊन संपूर्ण पान काळे पडते. त्यामुळे पिकाची अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते. उपद्रव अति झाल्यास ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते आणि ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट होते. 🌱उत्पादनातील घट टाळण्यासाठी पुढील प्रमाणे उपायोजना करणे आवश्यक आहे. ✔ प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील ऊस बियाणे नवीन ऊस लागवडीसाठी वापरू नये. ✔ ऊसाची लागवड पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी म्हणजे या किडीच्या व्यवस्थापनास मदत होईल. ✔ सुरुवातीस पानांवर लोकरी मावा आढळल्यास, ती प्रादुर्भावग्रस्त पाने काढून जाळून टाकावीत. ✔ ऊस पिकासाठी जास्त प्रमाणात पाण्याचा वापर टाळावा, आवश्यकतेनुसार ऊसास पाणी द्यावे. ✔ शिफारशीप्रमाणे संतुलित रासायनिक खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खतांच्या जास्त मात्रा देऊ नये तसेच शेणखत व गांडूळखत 20 टन प्रति हेक्टरी वापरावे. ✔ लेडी बर्ड बीटल, हिरव्या तांबूस जाळीदार पंखाचे कीटक, सिरपीड माशी, पतंगवर्गीय मावा खाणारी अळी, कोनोबाथ्रा, क्रायसोपर्ला कारनी यांसारख्या नैसर्गिक वाढणाऱ्या परभक्षक कीटकांची जोपासना करावी. परभक्षक कीटक सोडलेल्या क्षेत्रामध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. ✔ परभक्षक कीटकांची वाढ झालेली नाही व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल, अशा क्षेत्रामध्ये किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50%+सायपरमेथ्रीन 5% ईसी @2 मिली प्रति लिटर प्रमाणाने स्टिकर सोबत फवारणी करावी किंवा पिकास ठिबक सुविधा उपलब्ध असल्यास थायोमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी @500 ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1
इतर लेख