AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊसावरील खोडकिडीचा बंदोबस्त कसा करावा?
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
ऊसावरील खोडकिडीचा बंदोबस्त कसा करावा?
➡️ खोडकिड ही ऊसाचं नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. ➡️ सध्या नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे पिकात पोंगे मर हि समस्या दिसून येत आहे. ➡️ या किडीमुळे पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोडकिडीचा वेळीच बंदोबस्त करणं गरजेचं आहे. ➡️ ऊसावरील खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाय योजना कराव्या याबाबत जाणून घेऊया, ➡️ तर शेतकरी मित्रांनो, खोड किडीपासून ऊस पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी क्लोरँट्रनिलीप्रोल 0.4% GR घटक असलेले कीटकनाशक @ 8 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे अथवा क्लोरँट्रनिलीप्रोल 18.5% SC घटक असलेले कीटकनाशक @ 150 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन आळवणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
17
इतर लेख