AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊसामधील पोक्काबोईंग समस्या व उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
ऊसामधील पोक्काबोईंग समस्या व उपाय!
🌱ऊस पिकात पोक्का बोईंग या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उसाच्या वरच्या बाजूची कोवळी पाने चुरगळून पीळ पडल्यासारखी गोळा होण्यास चालू होतात व पाने आकाराने लहान राहतात. कालांतराने शेंड्याकडील पानांवर लालसर चट्टे पडून उसाची कांडी वरून खालपर्यंत सुकायला चालू होते. हा रोग सुरुवातीला हवेमार्फत तसेच रोगी बेणे लागवडीसाठी वापरल्यास व पाण्याद्वारे पसरला जातो. 🌱या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीसाठी निरोगी प्रक्रिया केलेले बेणे वापरावे. तसेच पिकात प्रादुर्भाव आढळून आल्यावर कॉपर ऑक्सी क्लोराईड 50% WP घटक असणारे कूपर 1 – 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात पहिली फवारणी करावी तसेच 8 दिवसांच्या अंतराने कार्बेन्डाझिम 50% WP घटक असणारे धानुस्टीन 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन दुसरी फवारणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
4
इतर लेख