गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसामधील पायरीला किडींचे नियंत्रण
पायरीला ही कीड अतिशय चपळ असून, या पानापासून दुसऱ्या पानावर जास्त प्रादुर्भाव करतात. या किडींची दोन्ही प्रौढ व पिल्ले पानामधील रस शोषून घेतात. मधासारखा पदार्थ त्यांच्या किडींच्या शरीरातून स्राव होतो आणि पानावर पडतो. परिणामी, ऊसाच्या पानांवर काळ्या काजळीसारखा थर तयार होतो, ज्याचा ऊसाच्या प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होतो आणि त्यामुळे उत्पन्न कमी होते. ऊसामधील पायरीला किडींच्या नियंत्रणासाठी खालील पध्दतीने व्यवस्थापन करावे. • प्रौढांनी घातलेल्या अंडी गोळा आणि नष्ट करावे. • मेटाराइझिम अॅनीस्पोली बुरशीजन्य-आधारित पावडर ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. • एपिरिकेनिया मेलानोलेयुका, परजीवी @ १ लाख परजीवी प्रति हेक्टर ऊसामध्ये सोडावेत. • परजीवी सोडलेल्या ऊसाच्या क्षेत्रात/शेतात कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करु नका • जर किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर क्लोरोपायरीफॉस २० इसी @२० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ इसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
134
1
इतर लेख