AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊसामधील खोडकिडीचे नियंत्रण
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसामधील खोडकिडीचे नियंत्रण
पावसाच्या हंगामानंतर पाणी भरण्याच्या स्थितीत कीटकांचे संक्रमण अधिक आढळते. हे कीटक ऊसाच्या गाभ्यामध्ये प्रवेश करून ऊसाचा गाभा खातात त्यामुळे उत्पन्न कमी होते.
व्यवस्थापन – • ऊसाची वाळलेली पाने काढून टाकावीत. • जुलै ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान १० दिवसाच्या अंतराने या कीटकांचे जैव-नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोग्राम ५०,००० प्रौढ / प्रति हेक्टरी कीटक सोडावेत. • क्लोरोपायरीफस २०% ई.सी. ५०० मिली प्रति ३०० -४०० लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • खोडकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरॉन ३ जी @ ८-१० किलो प्रति एकरी द्यावे. • क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ % एस सी ७५ मिली प्रति २००-२५० लि. पाण्यात फवारणी करावी. संदर्भ - श्री.एस. के. त्यागी
235
0