अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उसाला भर देण्याचे फायदे!
➡️ उसामध्ये सुरुवातीला फुटव्यांची संख्या कमी असेल तर उत्पादनावर त्याचा परिणाम होतो लागवडी नंतर ५५ ते ६० दिवसांमध्ये फुटव्यांची संख्या जास्त वाढण्यासाठी पारंपरिक पद्धतीने (बैलांच्या साहाय्याने) एक हलकी भर लावावी.
➡️ असे केल्याने जमिनीतील माती मोकळी होऊन हवा खेळती राहते व फुटवे चांगले वाढतात परंतु भर लावताना फुटवे खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
➡️ उत्तम उगवण क्षमता व पिकाची अन्नद्रवाची कमतरता भरून काढण्यासाठी लागवडीच्या ५५ दिवसानंतर यूरिया @५० किलो, २४:२४:०० @५० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये @१० किलो व पावर ग्रो चे सल्फर ९०% ३ किलो आणि भूमिका ४ किलो प्रती एकर एकत्र मिसळून जमिनीतून द्यावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.