किडींचे जीवनचक्रलियाकत अली तिवानो ऊस आयपीएम
उसातील खोड अळीचे जीवनचक्र
• हि उसातील एक प्रमुख किड आहे, ही कीड प्रामुख्याने वाढीच्या अवस्थेतील उसावर प्रादुर्भाव करते. या किडीची अळी अवस्था पिकाचे जास्त नुकसान करते. • या किडीमुळे पिकाचे साधारणतः ५०% नुकसान होते. • हि कीड ऊस रोपाच्या वरच्या भागात प्रवेश करून आतील भाग खाऊन नुकसान करते. • मादी पतंग ३०० ते ४०० अंडी देते. पानाच्या मागील बाजूने मुख्य शिरेलगत १०-३० अंड्यांच्या समूहाने अंडी घालते. अंडी मलईदार पांढर्या रंगाची असतात. • साधारण एका आठवड्यानंतर, अंड्यांमधून अळी बाहेर पडते आणि पानांचा वरचा भाग खाते त्यानंतर उसाच्या खोडामध्ये छिद्र करून आत प्रवेश करते. या अळीचे आयुष्य सुमारे तीन आठवडे असते. • यानंतर, अळी खोडामध्ये आत असलेल्या छिद्रांमध्ये कोषावस्थेत जाते. • कोषावस्थेतून ७ ते ९ दिवसांनंतर प्रौढ/पतंग बाहेर पडतो. • याचे नियंत्रण करण्यासाठी मोनोक्रोटोफॉस ३६% एसएल @ ८०० मिली प्रति एकरी प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- लियाकत अली तिवानो ऊस आयपीएम हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा!
202
0
इतर लेख