गुरु ज्ञानAgroStar
उन्हाळ्यात सेंद्रिय आच्छादन पिकांसाठी फायदेशीर!
🌱उन्हाळ्यात अधिक तापमान, जास्त
सूर्यप्रकाश यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांमधून आणि जमिनीतील ओलाव्यामधून बाष्पीभवन होत
असते त्यामुळे पिकांना आवश्यक असणारे पाणी मुबलक प्रमाणात भेटत नाही. त्यासाठी ऊसाचे
पाचट, गव्हाचा भुस्सा, भाताचा पेंढा, वाळलेल गवत, शेतातील काडी-कचरा वापरून जमिनीचा
पृष्ठभाग झाकून आच्छादन केल्यास बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी थांबते आणि जमिनीत
जास्त काळ ओलावा टिकून राहतो आणि त्याच पाण्याचा उपयोग झाडे, पिक वाढवण्यासाठी
होतो. तसेच सेंद्रिय आच्छादनमुळे जमिनीतील जिवाणूंची हालचाल आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण
वाढणे व तण नियंत्रण आणि तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.