आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळ्यात फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी
जास्त तापमान त्याचबरोबर झाडांना कमी फुटवा व कमी पाने असतील तर फळांचा तीव्र सूर्यकिरणांशी संपर्क येऊन फळे खराब होतात अथवा फळांची गुणवत्ता ढासळते व अशा फळांना बाजारात भाव मिळत नाही. यावर उपाययोजना म्हणून फळवाढी साठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांसोबतच झाडाच्या वाढीसाठी थोडासा नत्रयुक्त खतांचा वापर करावा जेणेकरून झाडावर फुटवा चांगला राहील व फळांची फुगवण देखील होईल. तसेच फवारणी साठी टी स्टेन चे ग्रीन मिरॅकल (अँटी ट्रन्स्पिरंट/बाष्पीभवन रोधक) २ मिली व सिलिकॉन १.२५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पहिली फवारणी करावी. त्यानंतर सायमोक्सानिल ८ % + मॅन्कोझेब ६४ % डब्ल्यूपी घटक असणारे बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन दुसरी फवारणी करावी. यामुळे फळाची गुणवत्ता टिकवून व फळांना बाजारात चांगला भाव मिळेल राहील.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
18
2
इतर लेख