AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात जमिनीची मशागत करणे अत्यंत महत्वाचे!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
उन्हाळ्यात जमिनीची मशागत करणे अत्यंत महत्वाचे!
•भारतात तीनही हंगामाचे चांगले वरदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्षभर विविध पिके घेतली जातात परंतु खरिफ हंगामात पुरेश्या पावसाच्या पाण्याची उपलब्धतता असल्याने खरीफमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली जाते. • पावसाळ्यात जमिनी ओल्या होऊन प्रसरण पावतात आणि उन्हाळयात कोरड्या होऊन आकुंचन पावतात तसेच वर्षभर पिके घेऊन जमिनी घट्ट होतात व भुसभुशीतपणा कमी होतो. • जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता जमिनीचे भौतिक, रायसानीक आणि जैविक गुणधर्म टिकवून ठेवणे फार गरजेचे आहे. • उन्हाळयात रब्बी हंगामाची पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीची खोलवर मशागत करून जमीन उन्हात तापून द्यावी जेणेकरून आधीच्या हंगामातील पिकांमुळे घट्ट झालेले मातीचे कण मोकळे होऊन भुसभुशीतपणा वाढेल तसेच जमिनीत हवा खेळती राहून पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारेल. आणि जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांची हालचाल व वाढ होण्यास मदत होईल • जमिनीची मशागत करताना आधी खोलवर नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत व जमीन उन्हात तापून द्यावी त्याचबरोबर आधीच्या पिकांचे आणि तणांचे अवशेष नष्ट करावे त्यामुळे पुढील हंगामात तणांचा प्रादुर्भाव कमी होईल. • जमीन उन्हात तापल्यामुळे जमिनीत असणाऱ्या किडींच्या आणि रोगांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास देखील मदत होईल. • पुढे उन्हाळी हंगाम संपण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळून कुळवणी करावी व जमीन सपाट करून घ्यावी. • त्यानंतर पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार पीक लागवडीसाठी सऱ्या किंवा वाफे तयार करून घ्यावेत आणि पीक लागवडीपूर्वी योग्य बेसल खतांची मात्रा देऊन पिकाच्या गरजेनुसार ठिबक किंवा मल्चिंग टाकावे. • पीक लागवडीपूर्वी पिकांची फेरपालट करणे, लागवडीसाठी योग्य वाणांची निवड, बीजप्रक्रिया व रोपप्रक्रिया या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. • शक्य झाल्यास जमिनीची मशागत करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करावे जेणेकरून खतांचे योग्य पद्धतीने नियोजन करता येईल • बहुवार्षिक फळपिकांमध्ये पावसाळ्यापूर्वीच शक्य झाल्यास जमिनीची हलकी मशागत करून तण आणि कीड व रोग व्यवस्थापन करावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
8