AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात जनावरांची काळजी
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
उन्हाळ्यात जनावरांची काळजी
या लेखामधून आपण जनावरांची उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ शकता. गोठा/शेड मध्ये काही बदल करून:- जनावरांना थेट सूर्यप्रकाश लागणार नाही अशा ठिकाणी बांधावे. तसेच गोठ्याचे छत शेणाचे किंवा छप्पर पांढऱ्या रंगाचे असल्यास थेट सूर्यप्रकाश टाळता तर येईलच त्याचबरोबर प्रखर उष्णतेच्या किरणांचे परावर्तीकरण होऊन गोठा थंड राहण्यात मदत होईल. गोठ्यात जनावरांची गर्दी असू नये. संपूर्ण दिवस व रात्र थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनावरांना गुळाचे पाणी पाजावे. शेडच्या सभोवताली घास, लहान झाडे लावल्यास जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करता येईल. रात्री, जनावरांना खुल्या जागेमध्ये बांधावे. जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे :- उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या शरीरावर थंड पाणी शिंपडावे. असे केल्याने त्यांच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. सकाळी ११ ते ३ वाजताच्या दरम्यान शेड/गोठ्यामध्ये पाणी शिंपडावे.
जनावरांच्या नियमित आहारात बदल करावा:- १) जनावरांना कमी परंतु उत्तम दर्जाचा आहार द्यावा. खाद्यातून "अ' जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा द्यावा. २) उन्हाळ्यामध्ये जनावरांना तीन - चार वेळा थंड पाणी पाजावे. ३) आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा. संदर्भ:- अॅग्रोस्टार पशु वैद्यकीय तज्ञ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
132
0
इतर लेख