पशुपालनAgrostar
उन्हाळ्यात कोंबड्यांचे पाणी आणि खाद्य व्यवस्थापन !
➡️उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्यांना वातावरणातील उष्णतेमुळे ताण येत असतो. याचा सरळ परिणाम उत्पादनावर होताना दिसतो. उन्हाळ्यात वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. या काळात कोंबड्यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरते.
➡️उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्यांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम –
शरीरात तयार होणारी उष्णता आणि शरीराबाहेर पडणारी उष्णता यामध्ये तफावत निर्माण झाल्यास पक्ष्यांना त्रास सुरु होतो. या काळात ब्रॉयलर पक्ष्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, तर खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. खालेल्या खाद्याचा शरीराच्या वजन वाढीसाठी उपयोग होत नाही. शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग वाढतो. पक्ष्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. पक्षी दगावण्याची शक्यता वाढते.
➡️ब्रॉयलर पक्ष्यांच्या शरीरात घाम स्त्रवणाऱ्या ग्रंथी नसल्याने या पक्ष्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. वातावरणातील तापमान खुप जास्त वाढल्यास तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलर कोंबड्या स्वतःच्या शारीरिक हालचाली कमी करतात. कोंबड्या त्यांच्या बेडिंग मटेरीअलमध्ये विष्ठा टाकतात. या विष्ठेचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते. याहून पुढे जाऊन ब्रॉयलर कोंबड्या त्यांची चोच आणि पंख उघडतात. आणि या सर्व गोष्टीद्वारे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
➡️एक पक्षी साधारणपणे २ लिटर पाणी एका किलो मागे पितो. ब्रॉयलर कोंबड्या साधारणपणे १:२ या प्रमाणात खाद्य आणि पाणी पीत असतात. तीव्रतेच्या उन्हाळ्यात हेच गुणोत्तर १:४ असे होते. म्हणून उन्हाळ्यात पाण्याची भांडी २५ टक्क्यांनी वाढवावी. दिवसातून ४ ते ५ वेळा पाण्याची भांडी भरावीत. पाण्याचे तापमान पोल्ट्री शेडमधील तापमानापेक्षा कमी राहील, याची काळजी घ्यावी.
➡️उन्हाळ्यात खाद्याचे व्यवस्थापन करत असताना पक्ष्यांना सकाळी लवकर आणि सायंकाळी खाद्य द्यावे, त्यामुळे खाण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात खाद्यातील कॅल्शियमची पातळी ३-३.५ टक्क्यांनी वाढवावी.उन्हाळ्यात पक्ष्यांची गर्दी होऊ नये म्हणून, १० टक्के जास्तीची जागा प्रत्येक पक्षाला द्यावी. लसीकरण किंवा इतर औषध उपचार या सर्व गोष्टी उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी कराव्यात. अशा रितीने आपण उन्हाळ्यात कोंबड्यांचे नियोजन करून, उष्णतेचा ताण कमी करता येऊ शकतो.
➡️सं दर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.