AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाची!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाची!
➡️उन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी वारे या घटकांचा केळी पिकावर प्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना: १) उन्हाळ्यात केळी लागवडीच्या वेळी बागेच्या भोवती चारही बाजूंनी वारारोधक सजीव कुंपण करणे आवश्यक आहे. २) ही कुंपणे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्णलाटेपासून तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून बागेचे संरक्षण करतात. त्यामुळे केळीच्या बागेत सुसह्य तापमान, आर्द्रता टिकून राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. वाऱ्याला अटकाव घातला गेल्याने पाने कमी प्रमाणात फाटतात. घड सटकण्याच्या आणि झाडे उन्मळून पडण्याच्या प्रमाणात घट येते. ३) केळी पिकाच्या कालावधीत केळीला १६०० ते २००० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यासाठी ठिबकसिंचन पद्धतीने मृगबाग केळीला एप्रिल महिन्यात १८ - २० लिटर तर मे महिन्यात २० - २२ लिटर पाणी प्रति झाड/दिन द्यावे. कांदेबागेसाठी या दोन्ही महिन्यामध्ये प्रतिझाड प्रतिदिन १० ते १४ लिटर पाणी द्यावे. ४) सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी पाॅलिप्राॅपलीन कापडाची स्कर्टिंग बॅग किंवा पिशवीने घड झाकावा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
9