AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन!
पशुपालनअॅग्रोवन
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन!
• जनावरांना उन्हात उभे न करता त्यांना जास्तीत जास्त सावली पुरविणे आवश्यक आहे • जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्यावी. • गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्‍यक आहे. एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास, उष्णतेचे निस्सारण होण्यास जास्त वेळ लागतो. • गोठ्याचे आजूबाजूच्या परिसरात झाडे लावावीत. जेणेकरून गोठ्यातील वातावरण थंड राहील. • गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी गोठ्यामध्ये जागा असावी. • गोठा बांधताना त्याच्या छताची उंची जास्त ठेवावी. • गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा. त्यामुळे उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांतील उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो. • गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावे. • हवा खेळती राहण्यासाठी गोठ्यात पंखे लावावेत. • गोठ्याच्या छतावर पाण्याचे स्प्रिंकलर्स लावावेत. जनावरांच्या शरीरावर स्प्रिंकलर, फोगर्स द्वारे पाणी मारावे. त्यामुळे जनावरांचे शरीर थंड राहण्यास मदत होते. • गोठ्याचा भोवती बारदान किंवा पाणी धरणारा कपडा बांधावा. जेणेकरून आत येणारी गरम हवा थंड होऊन येईल. आणि आतील थंड हवा आतच राहील. • जनावरांना स्वच्छ, थंड पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यामध्येच उपलब्ध करून द्यावे. मुक्त संचार गोठ्यातील पाणी थंड राहावे त्यासाठी पाण्याच्या टाक्या सिंमेटच्या असाव्यात. • जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावे. कारण चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरिरात अतिरिक्त उष्णता तयार होते. • या कालावधीत ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षारांचे प्रमाण द्यावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
21
6