AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी मूग, उडीद आणि चवळीतील कीटक ओळखा आणि त्यांचे नियंत्रण करा.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी मूग, उडीद आणि चवळीतील कीटक ओळखा आणि त्यांचे नियंत्रण करा.
उन्हाळ्यात, 15 फेब्रुवारी नंतर शेतकरी मूग, उडीद आणि पपईची लागवड नगदी पिके म्हणून करतात. जर या नगदी पिकातील कीटक कीड यांचे नियंत्रण सुद्धा केले नाही तर, उत्पादन आणि गुणवत्तेवर गंभीर परिणाम होतो. हे उद्दिष्ट ठेवून, या पिकातील किडी कशा ओळखाव्यात आणि त्यांचे प्रभावी नियंत्रण कसे करावे , याबद्दल अचूक मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मावा किडी: डिंभ आणि प्रौढ कीटक काळसर रंगाचे असतात. सुरूवातीला त्यांची संख्या कमी असते, पण मादी थेट पिल्लांना जन्म देते, त्यामुळे त्यांची संख्या वाढते. मावा कीड नव्या फांद्या, पाने आणि शेंगांना चिकटलेली आढळते. डिंभ आणि प्रौढ नव्या फुटव्यातून रस शोषतात , त्यामुळे पाने पिवळी पडतात. रोपाच्या वाढीवर परिणाम होतो. जास्त प्रादुर्भाव असेल तर, रोपाचा वरचा भाग आणि त्याच्या शेंगा गुंडाळल्या जातात आणि उत्पादन तसेच गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मावा किडी त्यांच्या शरीरातून गोड द्रव स्रवतात. हा स्राव पानांच्या पृष्ठभागावर चिकटतो, आणि त्यामुळे पाने चकचकीत दिसतात. या पदार्थावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे संपूर्ण रोप काळे दिसते. जेव्हा पाने काळी होतात तेव्हा प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. एकात्मिक व्यवस्थापन • मावा किडीच्या प्रादुर्भावाबरोबर या किडीचा नैसर्गिक शत्रू, ढाल किडा सुद्धा आढळतो. या ढाल किड्याच्या अळ्या आणि प्रौढ कीटक (काळ्या रंगाचे आणि पिवळे पट्टे असलेले) मावा कीड खातात आणि मावा किडीची संख्या कमी करतात. अशा वेळेला कीटकनाशके फवारणे टाळा. दुसरा शत्रू, क्रायसोपा अळ्या सुद्धा मावा कीड खातात. • प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात, 500 ग्रॅम निंबोळी अर्क (5% अर्क) किंवा 40 ग्रॅम व्हर्टीसिलीयम लेकानी पावडर 10 लिटर पाण्यात मिसळा आणि झाडावर फवारा. • जर प्रादुर्भाव जास्त असेल तर मिथाईल-ओ-डेमेटन 25 EC 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 SL 5 मिली किंवा थायोमेथोक्साम 25 WG 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा , म्हणजे या किडीचे प्रभावी नियंत्रण होईल.
पांढरी माशी: या माशीची पिल्ले आणि प्रौढ पानांमधील रस शोषून घेतात. पाने गुंडाळण्याचे प्रमाण जास्त प्रादुर्भाव असताना लक्षात येते. मूग, उडीद आणि चवळीत पिवळया मोझाईक विषाणू रोगाचा प्रसार करण्यात या माशीची मोठी भूमिका असते. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर, लहान माशा त्यांच्या शरीरातून गोडसर द्रव स्रवतात, त्यावर काळी बुरशी वाढते. या बुरशीमुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. एकात्मिक व्यवस्थापन • एनकार्शिया वास्प या किडीचा शत्रू असून ती पांढऱ्या माशीचे कोश नष्ट करते. • निंबोळीचा 500 ग्रॅम (5% अर्क) किंवा 50 मिली निंबोळी तेल किंवा 20 मिली (1 EC) ते 40 मिली (0.15 EC) निंबोळीवर आधारीत औषध 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारा. • अॅसिफेट 75 SP 10 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस 40 EC 20 मिली किंवा अॅसेटामिप्रीड 20 SP 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. डॉ. टी. एम. भारपोडा माजी कीटकशास्त्र प्राध्यापक बी. ए. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, आनंद कृषी विद्यापीठ, आनंद - 388 110 (गुजरात भारत)
171
0
इतर लेख