AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी मिरची पिकाचे लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgroStar
उन्हाळी मिरची पिकाचे लागवडीचे नियोजन!
🌱मिरची पिकाच्या जास्तीत जास्त तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन करणे महत्वाचे आहे. उन्हाळी मिरची लागवडीसाठी 30 ते 35 दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी. तसेच लागवडीसाठी 1 मीटर रुंदीचा व 1 फूट उंचीचा बेड तयार करून बेड मध्ये संतुलित खतांची मात्रा द्यावी. त्यानंतर बेड पाण्याने भिजवून त्यावर वर 1.5 फूट अंतर ठेऊन रोपांची लागवड करावी व पिकास वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. 🌱तसेच रोप वाढीच्या अवस्थेतच पिकात कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे लावावे. तिखट प्रकारातील मिरचीच्या लागवडीसाठी ॲग्रोस्टारच्या शाईन, ग्रीन हार्वेस्ट यांसारख्या वाणांची निवड करावी. तसेच कमी तिखट प्रकारातील मिरचीच्या लागवडीसाठी ॲग्रोस्टारच्या रोझी वाणाची निवड करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
0
इतर लेख