अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळी मिरची पिकाचे लागवडीचे नियोजन!
मिरची पिकाच्या जास्तीत जास्त तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन करणे महत्वाचे आहे. उन्हाळी मिरची लागवडीसाठी ३० ते ३५ दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी. तसेच लागवडीसाठी १ मीटर रुंदीचा व १ फूट उंचीचा बेड तयार करून बेड मध्ये संतुलित खतांची मात्रा द्यावी. त्यानंतर बेड पाण्याने भिजवून त्यावर वर १.५ फूट अंतर ठेऊन रोपांची लागवड करावी व पिकास वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. तसेच रोप वाढीच्या अवस्थेतच पिकात कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे लावावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.