AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी भुईमूग पिकातील वाळवी नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळी भुईमूग पिकातील वाळवी नियंत्रण!
➡️ पांढरट तपकिरी, थोडी पारदर्शक मुंगी सारखी वाळवी आपल्या चांगल्याच परिचयातील आहे. या वाळवी किडीची मादी मातीत खूप खोलवर राहते. मातीमध्ये खोलवर राहून भुईमूग पिकाचे नुकसान करून जमिनीतील कार्बनी पदार्थ खाते . तसेच भुईमुगाच्या खोड, मुळ्या, कोवळ्या शेंगा दाणे फस्त करते. अशा ठिकाणी बुरशीची लागण होते ज्यामुळे अफ्लाटोक्झीन (कडवट दाणे) तयार होतात. या किडीचा प्रादुर्भाव वालुकामय, चिकणमाती किंवा हलकी जमिनीत दिसून येतो. ➡️ वाळवी नियंत्रणासाठी - १.पिकातील दोन सिंचना दरम्यान निश्चित कालावधी ठेवावा. २. शेतात न कुजलेला किंवा अर्धवट कुजलेला काडी कचरा ठेवू नये. गोळा करून शेत स्वच्छ ठेवावे. ३. थायमेथोक्झाम ७५% घटक असणारे 'शटर' हे कीटकनाशक @४०-५० ग्रॅम प्रति एकर २०० ते ४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी, ठिबक किंवा जमिनीद्वारे द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2
इतर लेख