AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी
गुरु ज्ञानAgroStar
उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी
🌱उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या भुईमूग पिकाची वाणांनुसार 105 ते 115 दिवसांमध्ये काढणी केली जाते. काढणीस तयार झालेल्या पिकाची पाने पिवळी पडायला सुरुवात होते. शेंगाचे टरफल टणक बनते आणि आतल्या बाजूने काळसर दिसू लागते अशा वेळी पिकाची काढणी करून घ्यावी. काढणीच्या वेळी पूर्ण वाढ झालेल्या शेंगांच्या शिरा स्पष्ट दिसतात. काढणीला उशीर झाल्यास जमिनीतच अंकुर फुटायला सुरुवात होते. योग्य पक्वतेनंतर काढणी झाल्यानंतर शेंगा उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्याव्यात आणि त्यांनतर कोरड्या, स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख