AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी भात पिकातील लीफ हॉपर किडीचे व्यवस्थापन
• मुख्यतः ग्रीन लीफ हॉपर (हिरवे तुडतुडे), ब्राउन प्लांट हॉपर आणि व्हाइट बॅक प्लांट हॉपर उन्हाळ्यात लागवड केलेल्या भात पिकाचे नुकसान करतात. • या किडीची पिले आणि पिकांतील रस शोषण करतात. • प्रादुर्भावग्रस्त रोपे तपकिरी पिवळे आणि वाळल्यासारखी (सुकलेली) दिसतात. • जास्त प्रादुर्भाव होऊन, पिकामध्ये रोपे जळाल्यासारखी दिसतात. त्यामुळे त्याला "हॉपर बर्न" म्हणून संबोधले जाते. • गोलाकार मार्गाने हा प्रादुर्भाव वाढत जातो. • प्रादुर्भावग्रस्त रोपांच्या ओंबीमध्ये दाणे भरत नाहीत परिणामी उत्पादनात घट येते. • आठवडाभरात या किडीचा प्रादुर्भाव संपूर्ण शेतात पसरलेला दिसून येतो.
• विभाजित डोसमध्ये नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करावा._x000D_ • रोगाचा प्रादुर्भाव सुरु असताना पिकास पाणी देणे टाळा._x000D_ • फोरेट १० जी (१० किलो / हेक्टर) किंवा कार्बोफ्युरॉन ३ जी (२०-२५ किलो / हेक्टर) वापरून लीफ हॉपर्स नियंत्रित होऊ शकतात._x000D_ • नंतरच्या अवस्थेमध्ये दाणेदार (ग्रॅन्युलर) कीटकनाशक लागू करणे शक्य नसल्यास, अ‍ॅसीफेट ७५ एसपी @ १० ग्रॅम किंवा क्लोथिनिडिन ५० डब्ल्यूजी @५ ग्रॅम किंवा डायनोटोफ्युरॉन २० एसजी @४ ग्रॅम किंवा इथोफेनप्रॉक्स १० ईसी @१० मि.ली. किंवा फेन्यूबोकर्ब ५० ईसी @ २० मिली किंवा पायमेट्रोझिन ५० डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ • पिकाची सतत देखरेख करावी व पुढील प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त रोपे कापून टाकावीत._x000D_ _x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स _x000D_ _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_
42
6
इतर लेख