गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी तीळ पिकातील विविध अळ्यांचे नियंत्रण
• पावसाळी आणि उन्हाळ्याच्या काळातही तिळाची लागवड करता येते. • सामान्यत: गॉल माशी, पाने गुंडाळणारी अळी, हॉल्क मॉथ अळी, तुडतुडे आणि मावा या किडी उन्हाळी हंगामातील तीळ लागवडीचे नुकसान करतात. • काही अळ्या शीर्ष पाने एकत्र आणून आतमध्ये राहतात. • त्यास “हेड टाइड लार्वा” म्हणूनही संबोधले जाते. • या अळ्या पीक फुलोरा अवस्थेत असताना, कळी व फुलांवर प्रादुर्भाव करतात. • ज्या प्रादुर्भावग्रस्त भागांवर शेंगा लागत नाहीत. • पिकाच्या नंतरच्या टप्प्यात या अळ्या शेंगांवर प्रादुर्भाव करून आतील भाग खातात.
• या टप्प्यावर, या अळ्यांना 'शेंग पोखरणारी अळी' म्हणून ओळखले जाते. _x000D_ • पिकामध्ये इतर अवस्थेपेक्षा फुलोरा आणि शेंग धारणा अवस्थेत या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे अधिक नुकसान होते._x000D_ • काही परजीवी कीटक या किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण देखील करतात._x000D_ • इतर हंगामात, हे कीटक पेडलियम म्युरॅक्स लिन या ताणावर राहतात. म्हणूनच, पीक हंगामात आणि पिकाच्या नंतर देखील वेळोवेळी अशी तणे तणनाशक किंवा काढून नष्ट करावे._x000D_ • या किडींच्या पतंगास नियंत्रित करण्यासाठी पिकाच्या पेरणीनंतर सापळा स्थापित करावे._x000D_ • पिकात किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी बव्हेरिया बॅसियाना @४० ग्रॅम किंवा कडुनिंब आधारित कीटकनाशके @२० ते ४० मिली प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी._x000D_ • पेरणीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसानंतर क्विनॉलफॉस २० ईसी @२० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_
30
0
संबंधित लेख