AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यापासून 4 दिवस बंद राहणार बँका, महत्वाचे पूर्ण करा कामं!
समाचारन्यूज १८ लोकमत
उद्यापासून 4 दिवस बंद राहणार बँका, महत्वाचे पूर्ण करा कामं!
➡️ येणाऱ्या दिवसात तुमचं बँकेशी संबंधित काही महत्त्वाचं काम असेल तर लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्या. कारण नाहीतर तुम्हाला त्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागू शकते. महिनाअखेरस उद्या पासून 4 सुट्टया असणार आहेत. ➡️ या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. ➡️ कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जारी केली जाते. ➡️ उद्यापासून 4 दिवस असणार सुट्टीचे 👉 28 ऑगस्ट 2021: चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल 👉 29 ऑगस्ट 2021: रविवार 👉 30 ऑगस्ट 2021: जन्माष्टमीमुळे बँका राहणार बंद (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपुर, लखनऊ, पाठणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक) 👉 31 ऑगस्ट 2021: श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमध्ये बँका बंद. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3