AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उत्पादन वाढीसाठी कलमी रोपे
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उत्पादन वाढीसाठी कलमी रोपे
भाजीपाला उत्पादक शेतकरी नेहमीच नवनवीन तंत्र आणि संकल्पना आत्मसात करताना दिसतात. ज्यामुळे त्यांना उत्पादन वाढ सोबतच कमीत कमी खर्च होऊन, नफा वाढीसाठी आत्मसात केलेल्या तंत्राचा उपयोग निश्चितच होतो. टोमॅटो उत्पादकांना तर समस्यांचा डोंगर पार करून उत्पादनात उच्चांक गाठायचे ध्येय असते. अर्थात त्याला कारणही तसेच आहे; टोमॅटो पिकाची उत्पादन क्षमता आणि त्यासाठी लागणारे भांडवल याचा विचार करता प्रचंड फायदा मिळून देण्याची क्षमता असणारे हे पीक आहे.
आता टोमॅटोमध्ये असेच एक नवीन तंत्रज्ञान विकसित झाले ते म्हणजे कलम रोपे लावणे. कलम प्रक्रियेमध्ये रानटी टोमॅटो रोप कापून त्याला रूट स्टोक संबोधले जाते. त्यावर संकरीत व आपल्याला अपेक्षित असलेले टोमॅटो म्हणजेच सायन काडी कलम पद्धतीने जोडले जाते. ज्याद्वारे सुरूवातीच्या अवस्थेत रोपांना होणारी बुरशी लागण, सूत्र कृमी समस्या आणि अन्नद्रव्ये अपटेक प्रमाण यांच्या व्यवस्थित नियोजनासाठी कलमी रोपांचा वापर करून लागवड विकसित होताना दिसत आहे. यामध्ये रानटी प्रकारातील टोमॅटो ज्याचा पाणी ताण सहन करण्याची क्षमता जास्त, कीड व रोगाला बळी न पडता तग धरणारे गुणधर्म जास्त असतात. सोबतच मुळांचा विकास आणि क्रियाशीलपणा चांगला असतो. ज्याद्वारे दिलेल्या खतांचा व अन्नद्रव्यांचा अपटेक व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात होतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जमिनीतून उद्भवणारे रोग आणि बुरशी यांना सहनशील असणारे रूट स्टोक निवडलेले असल्यामुळे मूळसड, खोड कुज, मर रोग यांची लागण होण्याची भीती नसते. ज्याद्वारे प्रचंड खर्चिक अशा बुरशी नाशकांचा खर्च वाचतो. याचा दुसरा फायदा पाणी आणि अन्नद्रव्ये घेणारे रूट स्टोक रानटी असल्यामुळे आवश्यक प्रमाणात त्याचा अपटेक केला जातो आणि जोमदार अशी रोपे व झाडे बनतात. सोबतच उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे सर्वाधिक उत्पादनही देतात. वातावरण, कीड-रोग अशा अनेक ताण/तणाव सहन करण्याची ताकत अशा रोपांमध्ये असते. ज्यामुळे जास्त पाऊस, उष्णता व थंडी चा विपरीत परिणाम यावर होताना दिसत नाही. कलम करण्यासाठी रूट स्टोक २१ दिवसांचा व त्यावर कलमासाठी वापरण्यात येणारी सायन १५ दिवसांची असावी, कलम केल्यानंतर ५/७ दिवस रोप सावलीमध्ये आणि ५/७ दिवस प्रकाशात ठेवावे आणि नंतर मुख्य शेतीमध्ये लागवडीसाठी वापरावे. टोमॅटो साधी रोपे आणि कलमी रोपे यांच्या खर्चात प्रचंड तफावत असते त्यामुळे बुरशी नाशकांवर होणारा खर्च टाळला जातो. सुरूवातीच्या अवस्थेत होणारी रोपांची निदान १०% गॅप फिलिंग वर होणारा खर्च आणि एकंदरीत प्लॉट मागे पुढे होण्याची शक्यात पडताळून पाहता तंत्रज्ञान नक्कीच परवडेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साधारण प्लॉटपेक्षा काही प्रमाणात कलमी रोपे जास्त तोडे देऊ शकतात. ज्याद्वारे आर्थिक फायदा वाढविण्यासाठी मदत होते. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
513
1
इतर लेख