AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उजाला योजनेतंर्गत 10 रुपयात एलईडी ब्लब!
समाचार न्यूज १८ लोकमत
उजाला योजनेतंर्गत 10 रुपयात एलईडी ब्लब!
➡️भारत सरकारची सर्वांना स्वस्त दरात एलईडी बल्ब उपलब्ध करुन देणारी योजना 'उजाला योजने'ला आज ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गत देशातील जवळपास प्रत्येक राज्यात पिवळ्या बल्बच्या जागी स्वस्त दरातील एलईडी बल्ब च्या वापरासाठी प्रोत्साहित केलं जातं. या योजनेंतर्गत लोकांना केवळ १० रुपयांत एलईडी बल्ब दिला जातो. बल्बशिवाय ट्यूबलाइट आणि पंखेदेखील कमी किमतीत उपलब्ध केले जातात. ➡️पंतप्रधान यांनी 5 जानेवारी २०१५ रोजी उन्नत ज्योति बाय अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल योजना लाँच केली होती. पिवळ्या बल्बमुळे मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. हेच कमी करण्यासाठी सरकारने एलईडी बल्बला प्रोत्साहन देत हा प्रोग्राम लाँच केला होता. ➡️आतापर्यंत उजाला योजनेअंतर्गत देशभरात ३६.७८ कोटीहून अधिक लंड लाइट्सचं वाटप करण्यात आलं आहे. याच्या मदतीने घरोघरी वार्षिक वीज बिलात कमी आली आहे. २०१४ मध्ये एलईडी बल्बच्या किंमती अधिक होत्या. त्यावेळी एलईडी ची ३००-३५० रुपये प्रति बल्ब असणारी किंमत हळू-हळू ७०-८० रुपये झाली. सर्वांना स्वस्त दरात एलईडी उपलब्ध करण्याशिवाय या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात विजेचीही बचत झाली. ➡️उजाला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलईडी बल्बची किंमत ७० रुपये असते. परंतु ग्राहकांना हा बल्ब केवळ १० रुपयांत मिळतो. त्याशिवाय एलईडी ट्यूबलाइटची किंमत २२० रुपये आणि पंख्याची किंमत १११० रुपये आहे. ➡️उजाला योजनेमुळे अनेकांना स्वस्त दरातील एलईडी बल्ब मिळण्यासह, विजेच्या बचतीसह अनेकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत जवळपास ३५ हजार लोकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली. या लोकांना देशभरातएलईडी बल्ब डिस्ट्रिब्यूशनची जबाबदारी देण्यात आली आहे. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
130
13
इतर लेख