AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ई-पिक पाहणी’ नोंदणीसाठी मुदत वाढली!
कृषी वार्ताTV9 Marathi
ई-पिक पाहणी’ नोंदणीसाठी मुदत वाढली!
➡️ एकीकडे पावसाचे थैमान असताना ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला होता. मात्र, शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचे कारण नाही कारण या माध्यमातून खरीप पिकांच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. ➡️ ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता १५ ऑक्टोंबर पर्यंत पिकाच्या नोंदी करता येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे. ➡️ ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद ही स्व:ता करायची आहे. ‘ई-पीक पाहणी’ द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. ➡️ ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा ऐतिहासक निर्णय असून शेतकऱ्यांची गैरसाय ही टळणार आहे. ➡️ यामध्ये अनियमितता होणार नाही. प्रशासनाशी थेट जोडणी असल्याने पीक पेऱ्याची आकडेवारी, भविष्यातील उत्पादन आणि बाजारभाव याबद्दल शेतकऱ्यांना माहिती होणार आहे. ➡️ मात्र, राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करण्यास अडसर निर्माण झाला होता. राज्यातील परस्थिती लक्षात घेता ‘ई-पिक पाहणीला १५ ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
8
इतर लेख