AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ई-नाम वर शेतीमाल विकण्यासाठी काय करावे?
कृषि वार्ताAgrostar
ई-नाम वर शेतीमाल विकण्यासाठी काय करावे?
👉ई-नाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार होय. ई-नाम ही सुविधा एक देश एक व्यापार या संकल्पनेवर आधारित आहे. देशातील शेतकऱ्यांना हव्या त्या बाजारपेठेत शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य देणे हे ई-नाम पोर्टलचे मूळ उद्दिष्ट आहे. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्याचे काम ई-नामची यंत्रणा करत असते. 👉ई- नामची enaam.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. शेतकरी आपल्या जवळील बाजारपेठेतील शेतीमालाचे भाव या वेबसाईटवरून पाहू शकतात तसेच शेतीमालाची खरेदी विक्री देखील करू शकतात. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार ई-नामच्या माध्यमातून करता येतात. 👉तुम्हाला तुमचे पीक e-NAM द्वारे विकायचे असेल तर, 👉सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट enam.gov.in वर जावे लागेल. 👉यानंतर, मुख्यपृष्ठावर ‘नोंदणी’ वर क्लिक करा आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करा. 👉तुम्ही ईमेल अॅड्रेस टाकताच, तुमच्या ईमेल अॅड्रेसवर तात्पुरता लॉगिन आयडी दिला जाईल. 👉आता ई-नाम वर आपली नोंदणी करण्यासाठी या तात्पुरत्या लॉगिन आयडीद्वारे लॉग इन करा. 👉यानंतर, केवायसी तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा. 👉शेवटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेनंतर तुम्ही तुमचा माल विकू शकता. 👉संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
0
इतर लेख