AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडरची धमाल!
ऑटोमोबाईलtimesnowmarathi
इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडरची धमाल!
➡️कोरोना संकट काळात ऑटोमोबाइल क्षेत्राला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. ऑटोमोबाइल कंपन्यांकडून नवनवीन मॉडेल बाजारात आणली जात आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाच्या दरवाढीमुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होते आहे. पेट्रोलचे वाहन होते इलेक्ट्रिक ➡️यात महत्त्वाची बाब म्हणजे पेट्रोल-डिझेल वाहनाचे रुपांतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये करता येते. यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनाचे किट लावण्याची आवश्यकता असते. यामध्ये पेट्रोल-डिझेल इंधनद्वारे चालणाऱ्या इंजिनाच्या जागी कन्व्हर्जन किट लावला जातो. ➡️अलीकडच्या काळात काही स्टार्टअप्सनी कार आणि मोटरसायकलसाठी ईव्ही कन्व्हर्जन किट दिले आहेत. याचदरम्यान ठाण्यातील एका ईव्ही स्टार्टअपने गोगोए१ मोटरसायकलसाठी ईव्ही कन्व्हर्जन किट तयार केला आहे. ३५,००० रुपये अधिक जीएसटी इतकी किंमत मोजून तुम्ही तुमची मोटरसायकल इलेक्ट्रिक करू शकता. तीन वर्षांची वॉरंटी असलेले किट ➡️आरटीओकडून परवानगी असलेले हे किट ३ वर्षांच्या वॉरंटीसह येते. पूर्ण बॅटरी पॅकसह ९५,००० रुपयांची किंमत मोजून तुम्ही इलेट्रिक स्प्लेंडर घेऊ शकता. बाइक १५१ किमी प्रति चार्जची रेंज देते. गोगोए१ ने देशभरातील ३६ आरटीओवर इन्स्टॉलेशन सेटअप लावले आहेत. यांची संख्या लवकरच वाढवली जाणार आहे. ➡️फक्त १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होणार ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर अत्याधुनिक बाउन्सची इलेक्ट्रीक स्कूटर इन्फिनिटी येणार अत्याधुनिक बाउन्सची इलेक्ट्रीक स्कूटर इन्फिनिटी येणार बाजारात २०२७महिंद्रा अँड महिंद्रा २०२७ पर्यंत एसयूव्हीसह १६ इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करणार. ➡️या किटला आरटीओकडून मंजूरी मिळाली असल्यामुळे अशा बाइकमध्ये इन्श्युरन्सदेखील होतो. यामध्ये तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट मिळेल मात्र रजिस्ट्रेशन नंबर बदलणार नाही. या ईव्ही कन्व्हर्जन किटमध्ये २.८ किलोवॅट-आर बॅटरी पॅक लागेल, यामध्ये २ किलोवॅट ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटर असणार आहे. ➡️दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र होताना दिसते आहे. नवीन स्टार्टअप आपल्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि मोटरसायकल सातत्याने बाजारात लॉंच करत आहेत. एका चार्जिंगमध्ये जास्तीत जास्त अंतर पार करणाऱ्या स्कूटर्स बाजारात येत आहेत. ➡️हिरो मोटोकॉर्पने अशीच एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. हिरोने बंगळूरूस्थित लॉग ९ मटेरियलशी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप हिरोच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये बॅटरी बसवणार आहे. हिरो इलेक्ट्रिक टू व्हिलर्समध्ये लॉग ९ ची रॅपिडएक्स बॅटरी लागल्यानंतर या बॅटरी फक्त १५ मिनिटात पूर्ण चार्ज होणार आहेत. ➡️हिरो इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत एनवायएक्स इलेक्ट्रिक स्कूटर विकणार आहे. ही स्कूटर सध्या व्यावसायिक वापरासाठी विकण्यात येते आहे. याला एकदा चार्ज केल्यानंतर २१० किमी पर्यत चालवता येते. संदर्भ:- timesnowmarathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
10