AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इलेक्ट्रिक सायकल बाझिंगा बाजारात!
ऑटोमोबाईलTV9 Marathi
इलेक्ट्रिक सायकल बाझिंगा बाजारात!
➡️ नेक्सज़ू मोबिलिटी ने नेक्सज़ू बाजिंगा नावाची लाँग रेंज ई-सायकल लाँच केली आहे. ज्यामध्ये लिथियम-आयन बॅटरी आहे आणि ही सायकल १०० किमीची मोठी रेंज देते. बाजिंगा ई-सायकलची किंमत ४९,४४५ रुपये ठेवण्यात आली आहे आणि बाझिंगा कार्गो ई-सायकलची किंमत ५१,५२५ रुपये ठेवण्यात आली आहे. ➡️ कंपनीने बाजिंगा ई-सायकलची रचना युनिसेक्स ई-सायकल म्हणून केली गेली आहे जी स्त्री आणि पुरुष दोघेही वापरू शकतात. तसेच, ती वेगळ्या डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरीसह येते. ➡️ बुझिंगा कार्गोमध्ये १५ किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली मजबूत डिझाइन केलेले कार्गो कॅरेज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बाजिंगा इ-साइकिल रायडर्ससाठी सहज हॉप-इन आणि हॉप-आउटसाठी डिझाइन केल्या आहेत. ➡️ नेक्सज़ू मोबिलिटी फेब्रुवारी २०२२ मध्ये अधिकृतपणे उत्पादने लाँच करेल, परंतु ई-सायकल नेक्सज़ू मोबिलिटी ई-कॉमर्स वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. उत्पादन लाँच झाल्यानंतर प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी वितरण फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू होईल. नेक्सझू मोबिलिटी ग्राहकांसाठी झेस्ट मनीसह ईएमआय पर्याय तसेच सुलभ पेमेंटचा पर्याय ऑफर करत आहे. ➡️चाकणच्या ऑटोमोटिव्ह हबमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसह कंपनीकडे १०० हून अधिक डीलर टचपॉइंट्स आहेत, त्यांचे स्वतःचे ऑनलाइन स्टोअर आहे आणि अनेक ई-कॉमर्स पोर्टलवर ते उपस्थित आहेत. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
2