ऑटोमोबाईलTv9Marathi
इलेक्ट्रिक वाहनं खरेदीसाठी अनुदान!
➡️भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ हळूहळू वाढत आहे. परंतु, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आणि चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरच्या (पायाभूत सुविधा) अभावामुळे लोकांना सध्या इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे आवडत नाही किंवा परवडत नाही.
➡️मात्र फेम-2 हे इलेक्ट्रिक वाहनांशी निगडीत नाव अनेकदा ऐकायला मिळते. ही एक प्रकारची सबसिडी आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सूट मिळवता येते. फेम चा फुल फॉर्म फास्टर अड़ोपशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल्स इन इंडिया असा आहे.
काय आहे फेम-२सब्सिडी?
➡️फेम-२ सबसिडी गेल्या वर्षीपासून लागू आहे. याद्वारे ग्राहकांना दिला जाणारा लाभ सुरुवातीला १०००० रुपये प्रति kWh इतका निश्चित करण्यात आला होता. परंतु जून २०२१ मध्ये सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मर्यादा १५,००० रुपये प्रति kWh पर्यंत वाढवली.
इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे काय फायदे
➡️इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार फेम-२ अनुदानाचा लाभ देत आहे. हे अनुदान ग्राहकांना खरेदीच्या वेळीच मिळणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या लाभांव्यतिरिक्त, विविध राज्ये इलेक्ट्रिक वाहनांवर वेगवेगळ्या ऑफर देत आहेत.
संदर्भ:-Tv9Marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.