AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडियन बँकेत 'या' पदांच्या 202 जागांसाठी मोठी पदभरती!
नोकरीन्यूज १८ लोकमत
इंडियन बँकेत 'या' पदांच्या 202 जागांसाठी मोठी पदभरती!
इंडियन बँकेत नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी इंडियन बँकने सुरक्षा रक्षकांच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते भारतीय बँकेच्या अधिकाऱ्याला indianbank.in येथे भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी भरती सुरक्षा रक्षक - एकूण जागा 202 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सुरक्षा रक्षक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून १० वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच लष्कर/नौदल/हवाई दलातील माजी सैनिक असणं आवश्यक आहे. उमेदवाराला स्थानिक भाषेत बोलता, वाचता आणि लिहिता येत असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय २६ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १४५०० – ५००/४ – १६५०० – ६१५/५ – १९५७५ – ७४०/४ -२२५३५ – ८७०/३ – २५१४५ -१०००/३ – २८१४५ रुपये इतका पगार देण्यात येणार आहे. अर्ज कारण्याची शेवटची तारीख - ०९ मार्च २०२२ संदर्भ:-न्यूज १८ लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6
इतर लेख