AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंजिनीअर्ससाठी एनटीपीसी मध्ये भरती सुरु..
नोकरीमहाराष्ट्र टाइम्स
इंजिनीअर्ससाठी एनटीपीसी मध्ये भरती सुरु..
जर तुम्ही इंजिनीअरिंगमधील शिक्षण घेतलं आहे तर भारत सरकारची महारत्न कंपनी एनटीपीसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन (NTPC) ने विविध विभागातील इंजिनीअरिंग करणाऱ्यांसाठी शेकडो रिक्त पदे भरायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी, ऑनलाइन परीक्षा होणार नाही. पदाचे नाव - इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांची संख्या - २८० स्ट्रीम्स - इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रूमेंटेशन पे स्केल - ४० हजार ते १.४० लाख रुपये मासिक पर्यंत (हा बेसिक पे आहे. संपूर्ण वेतन अन्य भत्त्यांसह मिळेल.) कसा करायचा अर्ज ➡️ एनटीपीसी करियर ची वेबसाइट ntpccareers.net वर जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जून २०२१ आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी अॅप्लिकेशन फी ३०० रुपये आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज प्रक्रिया मोफत आहे. इच्छुक उमेदवार पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात. पात्रता (Eligibility) ➡️ मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग मध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक. गेट स्कोर (GATE score) देखील मागवण्यात आला आहे. वयोमर्यादा ➡️ कमाल वय वर्ष २७ हवे. आरक्षित प्रवर्गांमधील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. निवड प्रक्रिया ➡️ एज्युकेशनल मेरिट आणि गेट स्कोरच्या आधारे निवड करण्यात येईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- महाराष्ट्र टाइम्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
25
इतर लेख