AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आहारातून जनावरांना करा खनिजांचा पुरवठा!
पशुपालनAgrostar
आहारातून जनावरांना करा खनिजांचा पुरवठा!
👉🏻सूक्ष्म खनिजे शरीराला अतिशय कमी प्रमाणात आवश्‍यक असतात, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये आणि खासकरून गाभण आणि दुधाळ जनावरांमध्ये विविध समस्या निर्माण होऊन उत्पादनात घट होते. परिणामी, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. 👉🏻खनिजांचे शरीराच्या आवश्‍यकतेनुसार मोठी आणि सूक्ष्म खनिजे असे प्रकार पडतात. मोठ्या खनिजांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडिअम, क्लोरिन, सल्फर, मॅग्नेशिअम इ. महत्त्वाचे आहेत, तर सूक्ष्म खनिजांमध्ये लोह, झिंक, कॉपर, मॉलिबडेनम या खनिजांचा समावेश होतो. खनिजांची आवश्‍यकता इतर पोषणमूल्यांप्रमाणे गाभण काळात, तसेच विल्यानंतर (दुग्ध) उत्पादनाच्या काळात अधिक असते. • जनावरांना चारा (हिरवा आणि कोरडा) व इतर खाद्य (ढेप/पेंड) यामधून खनिजे पुरविली जातात. हिरवा चारा/धान्य, मुरघास यामध्ये सूक्ष्म खनिजांचे प्रमाण अधिक असते. सामान्यतः द्विदल धान्यामध्ये आणि त्यांच्या चाऱ्यामध्ये गवताच्या चाऱ्याच्या प्रमाणात खनिजाचे प्रमाण अधिक असते. जनावरांना देण्यात येणारा चारा/आहार हा इतर पोषकघटकांनी जरी युक्त असला, तरी त्यामध्ये खनिजांची कमतरता आढळते. • दुभत्या जनावरांवर अधिकाधिक उत्पादनासाठी आणि निरोगी वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. तरीसुद्धा गाभण काळात आणि विल्यानंतर दुग्धउत्पादना दरम्यान विविध समस्या निर्माण होतात. या समस्या उद्‌भवण्याची कारणे शेतकऱ्यांना बहुधा अनभिज्ञ असतात आणि उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. यातील बहुतेक समस्या या सूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे होतात. • जनावरांना खाद्यातून खनिज मिश्रणाचा पुरवठा नियमितपणे करणे आवश्‍यक असते. सूक्ष्म खनिजांची आवश्‍यकता ही जनावरांची शारीरिक अवस्था, वय, गाभणकाळ दूध देण्याचे प्रमाण, शरीरातील खनिजाचे प्रमाण/उपलब्धता यावर अवलंबून असते. • विविध भौगोलिक रचनेनुसार मातीमध्ये विशिष्ट खनिजाची प्रामुख्याने कमतरता जाणवते. त्यानुसारही खनिजाची उपलब्धता जनावरांना करून घ्यावी. • खनिजे आवश्‍यकतेपेक्षा जास्त प्रमाणात दिल्यास त्याचे शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळतात. त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने, आवश्‍यकतेनुसार जनावरांना खाद्यातून खनिजे पुरवावी. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख