AgroStar
आवळा: औषधी उपयोग आणि खतांचे व्यवस्थापन
सल्लागार लेखअपनी खेती
आवळा: औषधी उपयोग आणि खतांचे व्यवस्थापन
आवळा, जे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये फळांचा मुरंबा व लोणच्यासाठीचे असून, नेल्ली या नांवाने देखील ओळखले जाते, या वनस्पतीत अधिक औषधी गुणधर्म आहेत. आवळा फळे अशक्तपणा, घसा, अतिसार, दातदुखी आणि ताप यावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. हि फळे 'जीवनसत्व क' चा समृद्ध स्रोत आहेत. हिरव्या आवळा फळांचा लोणच्याबरोबरच शाम्पू, हेअर ऑईल, डाई, दात पावडर आणि सौंदर्य प्रसादाने यासारख्या इतर पदार्थ व वस्तू तयार करण्यासाठी वापर केला जातो. हे एक मऊ आणि अधिक फांद्या असणारे झाड असून यांची सरासरी उंची ८ ते १८ मीटर असते. याची फुले हिरवट-पिवळ्या रंगाची असून नर व मादी फुले दोन प्रकारची असतात. याची फळे फिकट पांढरट-पिवळ्या रंगाची आणि १.३-१.६ सेमी व्यासाची असतात. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश हे भारतातील प्राथमिक आवळा वाढणारी राज्ये आहेत. _x000D_ _x000D_ खत व्यवस्थापन_x000D_ _x000D_ • लागवडीयोग्य जमीन तयार करताना १० किलो शेणखताचा जमिनीत मिसळून वापर करावा. N:P:K खताची मात्रा नायट्रोजन (N) @१०० ग्रॅम/ झाड, फॉस्फरस (P) @५० ग्रॅम /झाड आणि पोटॅशियम (K) @१०० ग्रॅम/ झाड या स्वरूपात द्यावे. _x000D_ • खताची मात्रा हि एक वर्ष वयाच्या झाडाला दिली जाते आणि सतत १० वर्षांपर्यंत वाढविले जाते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फॉस्फरसची संपूर्ण मात्रा, पोटॅशियमची अर्धी मात्रा आणि नायट्रोजन बेसल डोसमध्ये दिले जाते._x000D_ • उर्वरित अर्धी खतमात्रा ऑगस्टमध्ये दिली जाते. बोरॉन आणि झिंक सल्फेट झाडाची वाढ आणि वयानुसार क्षारयुक्त जमिनीत @१००-५०० ग्रॅम प्रति झाड द्यावे._x000D_ _x000D_ संदर्भ - अपनी खेती_x000D_ _x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
171
1
इतर लेख