AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले, हळद बियाण्याची साठवणूक कशी करावी?
गुरु ज्ञानAgroStar
आले, हळद बियाण्याची साठवणूक कशी करावी?
🌱हळद आणि आले पिकात चांगल्या दर्जाचे बेणे वापरण्यासाठी पिकाची काढणी झाल्यानंतर बेण्याची योग्य पद्धतीने साठवणूक करणे गरजेचे आहे. यासाठी खालील पद्धतीने उपायोजना करणे गरजेचे आहे. - लागवडीसाठी निवडलेल्या बियाण्याची काढणी करून घ्यावी. काढलेले बियाणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावे. - बियाण्यांचा ढीग करताना हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. अन्यथा उगवणीवर परिणाम होऊ शकतो. - बियाणे थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावेत. ढिगावर आले/हळदीच्या वाळलेल्या पानांचा 10 ते 15 सें.मी. जाडीचा थर द्यावा. ज्या ठिकाणी तापमान जास्त असते अशा ठिकाणी पाल्यावर गोणपाट टाकावे आणि केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी गोणपाटावर शिंपडावे. - साधारणत: 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीपर्यंत बियाणे सुप्तावस्थेत जाते. या कालावधीत केवळ अंतर्गत बदल घडून येत असतात. कोणत्याही स्वरूपात बाह्य बदल दिसून येत नाहीत. - सुप्तावस्था संपेपर्यंत बियाण्यांवर पाणी वगैरे शिंपडू नये. साधारण 2 ते 2.5 महिन्यांत सर्व बियाण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते. सुप्तावस्था संपल्यानंतर बियाण्यामध्ये बदल दिसून येतात. या वेळी बियाण्यांवरील डोळे फुगीर होतात, डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. त्यानंतर मात्र बियाणे परत निवडावेत. - बियांण्यावरील मुळ्या काढाव्यात, पानांचे शिल्लक रहिलेले अवशेष काढावेत आणि मुळ्याविरहित, रसरशीत बियाणे लागवडीसाठी वापरावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0