AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले व हळद पिकातील कंदमाशीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले व हळद पिकातील कंदमाशीचे नियंत्रण!
लक्षणे:- • हि आले व हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. • या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. • कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. अंडी पांढरट रंगाची असतात. • अंड्यातून लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडतात व उपजीविकेसाठी कंदामध्ये शिरतात पुढे हि अळी पिवळसर होऊन तिला पाय नसतात. प्रादुर्भावग्रस्त कंदांना बुरशी, सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरु होतो. कंद मऊ होतात, त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात.  याच्या नियंत्रणासाठी • अर्धवट कुजले, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. • जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत. • व हेक्टरी ६ पसरत भांडी (माती अथवा प्लास्टिक) वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी @२०० ग्रॅम घेऊन त्यात १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते ते १० दिवस या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशा आकर्षित होतात. त्यात पडून मरू लागतात. हि उपाययोजना अत्यंत प्रभावी, कमी खर्चिक व सहजरित्या करण्यासाठी आहे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
109
62
इतर लेख