AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले लागवडीसाठी पहा विविध वाणांची वैशिष्ठ्ये!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
आले लागवडीसाठी पहा विविध वाणांची वैशिष्ठ्ये!
ज्या भागात हे पीक घेतले जाते, त्या भागाच्या नावावरून जात ओळखली जाते. उदा. कालिकत, कोचीन, आसाम, भारत, उदयपुरी, औरंगाबादी, गोध्रा इ.राज्यात माहिम जातीची लागवड केली जाते. काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओ-डी-जानरो, चायना, मारन जमेका या जातींचा समावेश आहे. ➡️ वरदा : कालावधी : २०० दिवस., तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के. सरासरी ९ ते १० फुटवे. रोग व किडीस सहनशील. सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के. उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २२.३ टन. ➡️ महिमा : कालावधी : २०० दिवस. तंतूचे प्रमाण : ३.२६ टक्के सरासरी १२ ते १३ फुटवे. सूत्रकृमीस प्रतिकारक सुंठेचे प्रमाण :१९ टक्के. उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २३.२ टन ➡️ रीजाथा : कालावधी : २०० दिवस तंतूचे प्रमाण : ४ टक्के सुगंधी द्रव्याचे प्रमाण : २.३६ टक्के. सरासरी ८ ते ९ फुटवे. सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के. सरासरी उत्पादन :प्रतिहेक्‍टरी २२.४ टन ➡️ माहीम : महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात. कालावधी : २१० दिवस मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात. ६ ते १२ फुटवे. सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के. उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २० टन 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1
इतर लेख