सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले लागवडीची योग्य वेळ व पूर्वतयारी!
साधारणपणे आले पिकाची लागवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जून महिन्याचे मध्यापर्यंत केली जाते. मे-जून मध्ये लागवड केलेले आल्याचे पीक जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत काढणीस तयार होते. आले लागवड १५ जून पेक्षा उशीरा झाल्यास उत्पादनात घट येते.
पूर्व मशागत:
पुर्वीचे पीक काढल्यानंतर आलेच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची १८ ते २२ सेंमी खोल नांगरणी करानी. वखराच्या पाळ्या देवून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी एकरी २० ते ३० बैलगाडी किंवा १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट टाकावे. जमिनीत बारमाही तणे जसे हरळी, लव्हाळा इ. असल्यास ती वखरणीसोबतच वेचून घ्यावीत.
जमीन:
पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत किंवा कमी निचऱ्याच्या जमिनीत कंद नासणे हा रोग मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे क्षारयुक्त, पाणथळ, चिबड व कमी निचऱ्याच्या व कडक होणाऱ्या जमिनीत आले चांगले येत नाही म्हणून अशा जमिनी टाळाव्यात. मध्यम काळी, भुसभुशीत, पीकाचे उत्तम पोषण होईल अशी कसदार गाळाची जमीन निवडावी. अशा जमिनीत हरळी, कुंदा, लव्हाळा यासारखी बहुवर्षिक तणे नसावीत.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.