अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
आले पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे? मग असे करा व्यवस्थापन!
👉 आल्याची रुंद वरंबा (गादी वाफा) पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा.
👉 जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये.
👉 सतत ओलावा राहिल्यास कंद कुजतात. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होते.
👉 पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे.
👉 आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे आले पिकास पाणी देत रहावे.
👉 कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये आल्याला पाण्याची गरज मर्यादित असते.
👉 आले काढावयाचे असल्यास पिकास पाणी कमी करत जाऊन आठ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी पूर्णपणे बंद करावे.
पाणी एकदम बंद केल्यास आल्याला परत अंकुर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे वजनात घट येते.
👉 आल्याचे कंद चांगले पोसण्यासाठी आठ महिन्यांपर्यंत ०-०-५० हे खत ठिबकमधून सुरू ठेवावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.